४६६ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचं आरोपपत्र दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीआय अर्थात, केंद्रीय अन्वेषण संस्थेनं येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर आणि अवंथा समूहाचे प्रवर्तक गौतम थापर तसंच त्यांच्या कंपनीविरुद्ध ४६६ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केलं आहे. सीबीआयनं या आरोपींवर २०१७ ते २०१९ दरम्यान विश्वासघात, फसवणूक, गुन्हेगारी कट आणि सार्वजनिक पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवला आहे.