प्रधानमंत्र्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव दिल्ली इथं सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव आजपासून दिल्ली इथं सुरू झाला. हा लिलाव पुढील महिन्याच्या २ तारखेपर्यंत सुरू राहणार असून, एक हजार २२२ स्मृतिचिन्हांचा ई-लिलाव यावेळी करण्यात येईल. पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंमध्ये गणेशमूर्ती, स्वामी विवेकानंद, राम मंदिर, नेताजी पुतळा, चित्रकला आणि क्रीडा साहित्याचा समावेश आहे.

नवी दिल्लीत पत्रकारांना माहिती देताना, सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले, नमामि गंगेच्या माध्यमातून गंगा नदीच्या संवर्धनाच्या उदात्त हेतूसाठी त्यांना मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचा लिलाव करणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. भेटवस्तूची सर्वात कमी किंमत शंभर रुपये आणि सर्वोच्च  किंमत पाच लाख रुपये असल्याचंही रेड्डी यांनी सांगितलं.