जगभरातले ३४ कोटी ५० लाख लोक उपासमारीच्या वाटेवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातले ३४ कोटी ५० लाख लोक उपासमारीच्या वाटेवर असल्यामुळे जगासमोर ‘न भूतो ना भविष्यती’ असं मोठं संकट उभं ठाकल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक डेव्हिड बिसले यांनी दिला आहे. ४५ देशातले कोट्यवधी लोक तीव्र स्वरूपाच्या कुपोषणाचा सामना करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वत्र अन्न असुरक्षितता वाढत असून हा युद्ध संघर्ष आणि हिंसेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दुष्परिणाम असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे मानवता व्यवरहार अवर सचिव मार्टिन ग्रिफिथिस यांनी यासंदर्भात म्हटलं आहे. सुरक्षा परिषदेनं ही युद्धे थांबवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे.