शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी गणेश मंडळांना भेटी देण्यात मग्न असल्याची अंबादास दानवे यांची टीका

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी असंवेदनशील सत्ताधारी गणेश मंडळांना भेटी देण्यात मग्न असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातल्या समनापूर इथल्या आत्महत्या केलेले शेतकरी नवनाथ शेळके आणि रुईलिंबा इथले आत्महत्या केलेले शेतकरी भागवत पिसाळ यांच्या घरी दानवे यांनी सांत्वनपर भेट दिली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं.