प्रवासी वाहतुकीच्या वाहनांमध्ये किमान ६ एअरबॅग्ज बंधनकारक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवासी वाहतुकीच्या वाहनांमध्ये किमान ६ एअरबॅग्ज बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पुढच्या वर्षीच्या १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. जगभरातल्या वाहन उद्योगाला पुरवठ्यात येणाऱ्या अडचणींमुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व प्रवाशांच्या काळजीला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.