वाहतूक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्याचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहतूक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा व्हायचा असेल तर पर्यायी इंधनाचा वापर गरजेचा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि  रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित इनसाईट २०२२ या गुंतवणूक विषयक संमेलनात ते बोलत होते. वाहतुकीसाठी चांगले रस्ते सरकार तयार करत असून पेट्रोल आणि डिझेल ऐवजी वीज, जैव इंधन अशा पर्यायांना प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले.