महिला एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताचा इंग्लंडवर ८८ धावांनी विजय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यान काल कँटरबरी इथं झालेल्या ५० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 88 धावांनी पराभव करुन मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी विक्रमी ३३३ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाबाद १४३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ २४५ धावा करु शकला. रेणुका ठाकुरनं चार गडी बाद केले. हरमनप्रीत कौर सामनावीर ठरली. तिसरा आणि अंतिम सामना शनिवारी लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. यानंतर अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image