भारतात येणाऱ्या खाजगी मोटार वाहन (बिगर मालवाहू वाहने) नियम, 2022 विषयक अधिसूचना जारी

 

नवी दिल्‍ली, 5 सप्‍टेंबर 2022

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 02.09.2022 रोजी GSR 680(E) अधिसूचनेद्वारे भारतात येणाऱ्या खाजगी मोटार वाहनांसाठी (नॉन ट्रान्सपोर्ट व्हेईकल्स व्हिजिटिंग इंडिया) नियम 2022 जारी केले आहेत. हे नियम, इतर देशांमध्ये नोंदणीकृत गैर-वाहतूक (वैयक्तिक-बिगर मालवाहू वाहने) वाहनांच्या हालचालींना भारताच्या हद्दीत प्रवेश करताना किंवा चालवताना दिशा निर्देश करतात.

या नियमांनुसार देशातील मुक्कामाच्या कालावधीत चालणाऱ्या वाहनांमध्ये पुढील कागदपत्रे बाळगली पाहिजेत. मुख्यत्वे:-

  1. वैध नोंदणी प्रमाणपत्र;
  2. वैध ड्रायव्हिंग परवाना किंवा आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट, जे लागू असेल ते;
  3. वैध विमा पॉलिसी;
  4. वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (मूळ देशात लागू असल्यास);

जर वरील कागदपत्रे इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेत असतील तर, त्यांचे जारी करणार्‍या अधिकार्‍याद्वारे प्रमाणित केलेले अधिकृत इंग्रजी भाषांतर, मूळ कागदपत्रांसह सोबत बाळगणे गरजेचे आहे.

भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशात नोंदणीकृत मोटार वाहनांना भारताच्या हद्दीत स्थानिक प्रवासी आणि वस्तूंची वाहतूक करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशात नोंदणीकृत मोटार वाहनांना भारताच्या मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत बनवलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

राजपत्रित अधिसूचनेसाठी येथे क्लिक करा.