मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम सोलिह यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह चर्चा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम सोलीह यांच्याशी व्यक्तिगत आणि शिष्टमंडळ पातळीवर चर्चा केली. या भेटीत उभयपक्षी संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली असं भारताचे मालदीवमधले उच्चायुक्त मनु महावार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. सायबर सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात ६ द्विपक्षीय करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या झाल्या.

मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम सोलीह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही सदिच्छा भेट घेतली. उद्या ते मुंबईत येणार असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. मालदीवचे भारताबरोबर व्यापारी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं हा दौरा ते करत आहेत. कोविड काळातही उभय देशांमधला व्यापार ३१ टक्क्यांनी वाढला असल्याचं महावार यांनी सांगितलं.