शिवसेनेतल्या दोन गटांच्या वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आजचा युक्तिवाद संपला पुढची सुनावणी उद्या

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेतल्या फुटीनंतर दोन्ही गटांचा मूळ पक्ष असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीला आला आहे. सरन्यायाधीश एन व्ही. रामण्णा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठासमोर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सध्या सुरु आहे.

ठाकरे गटाच्या बाजूने कपिल सिबल तर शिंदे गटाच्या बाजूने हरीश साळवे युक्तिवाद मांडला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू मांडली. पुढची सुनावणी उद्या होणार आहे. न्यायालयाच्या निवाड्यावर सध्याच्या सरकारचं आणि सरकारनं घेतलेल्या निर्णयांचं तसंच कामकाजाचं भवितव्य ठरणार आहे.