केंद्रीय पृथ्वी विज्ञान आणि अवकाश त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय पृथ्वी विज्ञान आणि अवकाश त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह आज दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेला आज ते भेट देणार असून सीएसआयआरच्या नवीन इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

काही स्टार्टअप उद्योजकांशीही ते यावेळी संवाद साधतील. उद्या केपीआयटी या उद्योग समूहाला ते भेट देणार आहेत. या उद्योगाच्या बीपीए पथदर्शी प्रकल्पाचं उद्घाटन सिंह यांच्या हस्ते होणार आहे.