राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या आणि इतर मागण्यांसाठी विरोधी पक्षसदस्यांची विधानभवन परिसरात घोषणाबाजी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या आणि इतर मागण्यांसाठी विरोधी पक्षसदस्यांनी  विधानभवन परिसरात घोषणा दिल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत आक्रमकपणे सरकार विरोधात लढणार असल्याचं स्पष्ट केलं.