प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदतर्फे भारतासाठी स्पर्धात्मकता रोडमॅप@१०० जारी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदने भारतासाठी स्पर्धात्मकता रोडमॅप@१०० जारी केला आहे. परिषदेचे अध्यक्ष बिबेक देबरॉय, G-२० शेर्पा अमिताभ कांत आणि परिषदेचे सदस्य संजीव संन्याल यांच्या उपस्थितीत त्याचं प्रकाशन करण्यात आलं. २०४७ पर्यंत, भारताला उच्च उत्पन्नाचा देश होण्यासाठी तसंच स्पर्धात्मकतेत टिकून राहण्यासाठी हा रोडमॅप मार्गदर्शन करेल, असं परिषदेचे सदस्य संजीव संन्याल यांनी सांगितलं आहे.

धोरणात्मक उद्दिष्टं, तत्त्वं आणि अर्थव्यवस्थेला लवचिकतेने पुढं नेण्यासाठी तसंच सामाजिक प्रगती आणि भारताची सध्याची आर्थिक स्थिती, स्पर्धात्मक फायद्यांच्या सखोल तपासणीवर आधारित प्राधान्यकृत उपक्रमांचं एकात्मिक धोरण हा रोडमॅप सादर करेल. भारताने कोणत्या कृतींना प्राधान्य द्यावं तसंच कृती प्रभावीपणे राबवण्यासाठी संघटनात्मक कार्यांवर कसा जोर द्यावा याबाबत तसंच सामायिक समृद्धीमधे अंतर्भूत असलेल्या दृष्टिकोनांचा प्रस्ताव सादर करुन या कार्यासाठी हा रोडमॅप संबोधित करेल.