चाबहार बंदराच्या माध्यमातून मध्य आशिया क्षेत्रातल्या देशांशी व्यापार वृद्धीच्या संधी खुल्या करण्याच्या दिशेनं भारत काम करत आहे - सर्बानंद सोनोवाल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चाबहार बंदराच्या माध्यमातून मध्य आशिया क्षेत्रातल्या देशांशी व्यापार वृद्धीच्या संधी खुल्या करण्याच्या दिशेनं भारत काम करत असल्याचं केंद्रीय नौवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयोजित चाबहार परिषदेला संबोधित करत होते.

चाबहार हे बंदर म्हणजे प्रगत मध्य आशिया क्षेत्राला दक्षिण आशियाच्या बाजारपेठेशी जोडणारा दुवा असून हे बंदर व्यापार आणि  आर्थिक सहयोग वाढवणारं बंदर म्हणून उदयाला आलं असल्याचं सोनोवाल म्हणाले.

हे बंदर दोन भूभागांशी केवळ संपर्कच प्रस्थापित करणार नसून गुंतवणुकीचा ओघ वाढवण्यासह ते सांस्कृतिक आणि राजकीय संबंधांना बळकटी आणणार असल्याचंही सोनोवाल म्हणाले.