खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या रकमेत वाढ करणार - गिरीष महाजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या सरकारच्या काळात ठरवलेल्या पारितोषिकांच्या रकमेत लक्षणीय वाढ करणार असल्याचं क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलं. ते आज माटुंग्यात खेळाडूंच्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी  कमलेश मेहता, प्रदीप गंधे, जय कवळी, शिवाजी पाटील, गॉडफी पेरेरा, वर्षा उपाध्ये, प्रशांत मोरे, वैभवी इंगळे, रिचा रवी, आणि नताशा जोशी या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्याआधी त्यांनी चर्चगेटच्या मुंबई हॉकी असोसिएशनमधल्या मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.