भारत आणि अमेरिका देशांचा संयुक्त महालष्करी सराव यंदा ऑक्टोबरमध्ये होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यावर्षी ऑक्टोबरमध्ये उत्तराखंडमधल्या औली इथं २ आठवड्यांचा संयुक्त युद्ध सराव करणार आहेत. उभय देशांमधली संयुक्त सरावाची ही  १८ वी फेरी आहे. दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढवणे हे या सरावाचे उद्दिष्ट आहे. अमेरिकेत अलास्का इथं  गेल्या वर्षी सरावाची १७ वी फेरी झाली होती.  

भारत आणि अमेरिका यांच्यातले संरक्षण विषयक संबंध हे गेल्या काही वर्षात अधिक दृढ झाले असून, दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षा यासंबंधी अनेक महत्वाचे करार झाले आहेत. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image