युक्रेनच्या झापोरिझ्झिया अणु प्रकल्पाजवळ झालेल्या गोळीबारावर भारताने चिंता व्यक्त केली आहे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधील झापोरेझ्झीया या अणुउर्जा प्रकल्पाच्या अणुइंधन साठवणुक यंत्रणेजवळ रशियाने केलेल्या हल्ल्याच्या वृत्तावर भारताने चिंता व्यक्त केली आहे. आण्विक सुविधांच्या सुरक्षिततेला बाधा येऊ नये यासाठी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी संयम बाळगावा असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या कायमस्वरूपी प्रतिनिधी रुचिरा कांबोज यांनी उभय देशांना केलं आहे. या प्रकल्पांना दुर्दैवानं काही अपघात झाल्यास त्याचा नागरिकांचं आरोग्य आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेऊन या बाबीला भारत विशेष महत्व देतो असं काम्बोज पुढे म्हणाल्या.