केरळमधील रेबीजच्या मृत्युंची शास्त्रीय चौकशी करण्याचा आदेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये रेबीजनं होत असलेल्या मृत्यूंचे प्रमाण गंभीर असल्यानं याची वैज्ञानिक चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. रेबीज संसर्गाची वाढती चिंता आणि रेबीज प्रतिबंधक लसीच्या परिणामकारकतेबद्दल निर्माण झालेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी ही चौकशी करण्यात येत आहे. तज्ज्ञ समितीला दोन आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. केरळमध्ये या वर्षी रेबीजच्या संसर्गानं १९ जणांचा मृत्यू झाला असून लस घेतल्यानंतरही रेबीजच्या संसर्गानं दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं सरकारवर टीका होत आहे.