देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांनी घेतली शपथ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ दिली. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात. उपराष्ट्रपती पदाच्या ६ तारखेला झालेल्या निवडणुकीत, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असलेल्या धनखड यांनी विरोधी पक्षाच्या मार्गारेट अल्वा यांचा ५२८ विरुद्ध १८२ मतांच्या मोठ्या फरकानं पराभव केला होता.