अमेरिकेत मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी म्हणून जाहीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका सरकारने मंकीपॉक्स या रोगाला सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी म्हणून जाहीर केलं आहे. जगभरातील देशांपैकी अमेरिकेत या रोगाचे सर्वात जास्त रुग्ण आतापर्यंत आढळून आले असून ,नागरिकांनी या रोगाच्या प्रादुर्भावासंदर्भात गंभीर दखल घेऊन काळजी घ्यावी अस आवाहन अमेरिका सरकारने केलं आहे. गेल्या दोन महिन्यात अमेरिकेत मंकीपॉक्स रोगाचे 6 हजाराच्या पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.