प्रत्येकानं देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी भव्य आणि दृढ संकल्प करा - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ७५ वा स्वातंत्र्यदिन काल सर्वत्र अत्यंत उत्साहात साजरा झाला. देशभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

देशाच्या अमृतकाळामध्ये प्रवेश करत असताना पुढील २५ वर्ष आपल्या देशासाठी अत्‍यंत महत्‍वपूर्ण आहेत; त्यासाठी आपल्याला पाच निर्धार करावे लागतील असं आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केलं.

प्रत्येकानं देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी भव्य आणि दृढ संकल्प करा, गुलामगिरीची लहानशी जाणीवही मनात ठेवू नका आपल्या समृद्ध परंपरांचा अभिमान बाळगा, 130 कोटी भारतीयांची एकता, एकजूट दाखवून द्या, आणि प्रत्येक नागरिकानं आपल्या कर्तव्यांचं यथायोग्य पालन करा; असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. 

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image