ऊर्जा खरेदीसाठी दरांचं सुसूत्रीकरण आवश्यक - नितीन गडकरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा खरेदीसाठी दरांचं सुसूत्रीकरण करणं आवश्यक असण्यावर महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भर दिला आहे.  ते आज  मुंबईत राष्ट्रीय कॉनजनरेशन पुरस्कार सत्कार सोहळ्यात बोलत होते.  केंद्र सरकारच्या धोरणांच्या अनुषंगाने काही राज्य आपली दर निश्चिती करत नसल्याचं त्यांनी सांगितलं. ऊस हे देशातलं महत्त्वाचं पीक असून सरकारनं कृषी उद्योगा बरोबरच वीज आणि ऊर्जा क्षेत्रावर भर देण्याचा निर्णय घेतल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे.

सरकारनं  पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. सध्या उसापासून होत असलेली साखर निर्मिती कमी करून ऊस उत्पादनांपासून  इथेनॉल निर्मितीकडे वळण्याची वेळ आली असल्याचं मत  गडकरी यांनी व्यक्त केलं. इथेनॉलची गरज खूप मोठ्या प्रमाणावर वाढली असून गेल्या वर्षी देशाची हे उत्पादन बनवण्याची क्षमता ४०० कोटी लिटर एवढी होती अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image