कारागिरांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी जोडणं आवश्यक - पियुष गोयल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी विणकर आणि कारागिरांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी जोडणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आठव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्यांनी संबोधित केलं. ई-कॉमर्स  संबंधित उपक्रमांचा उपयोग केला पाहिजे. तसंच भारत सरकारच्या जेईम पोर्टलवर हातमाग विणकर आणि कारागीरांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी असं ते यावेळी म्हणाले.

हातमाग आणि हस्तकला क्षेत्रातल्या कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी अशाप्रकारचे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यावर त्यांनी भर दिला. हातमागाच्या मूलभूत गुणवत्तेशी तडजोड न करता कष्ट कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा निवडक वापर करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.