राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवारपासून मुंबईत सुरुवात

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी सरकारनं सर्वपक्षीय सदस्यांसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून, त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. २५ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनकाळात १९,२०,२१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. तर २४ ऑगस्टला विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे.