संसदेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत - अनुराग ठाकूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत, अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. ते आज संसदेबाहेर बातमीदारांशी बोलत होते. भाववाढीवरची चर्चा, कामकाजाच्या सूचीत आहे. मात्र विरोधक चर्चेसाठी तयार नाहीत. त्यांना चर्चेत रस नसून, कामकाज विस्कळीत करणं एवढाच त्यांचा हेतू असल्याचं उघड झालं आहे, असं ते म्हणाले.