उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड द्रुतगती मार्गामुळे औद्योगिक प्रगतीचा मार्ग सुकर झाल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात जालौन जिल्ह्यातील ओराई इथं बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचं उद्घाटन केलं. या रेल्वेमुळे ४ तासांचा प्रवास कालावधी कमी झाला असून एक्सप्रेस वे मुळे बुंदेलखंडाला औद्योगिक प्रगतीचा मार्ग मिळाला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बुंदेलखंडाचा पर्यटन केंद्र म्हणून विकास झाल्यास रोजगार निर्मिती आणि महसूल मिळण्यास मदत होईल, असं प्रधानमंत्री म्हणाले.
राज्य सरकारने उत्तरप्रदेशातील युवकांसाठी दुर्गम किल्ले चढण्याची स्पर्धेचं आयोजन करावं, जेणेकरुन हजारो युवक या स्पर्धेमधे सहभागी होऊ शकतील आणि यामधून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील, असे निर्देश प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिले. विकास कार्यामधे छोट्या शहरांना प्राधान्य देणार असल्याचही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
२९ फेब्रुवारी २०२० रोजी प्रधानमंत्र्यांनी या द्रुतगती मार्गाची पायाभरणी केली होती. हा द्रुतगती मार्ग चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जालौन, औरैया आणि इटावा या सात जिल्ह्यांमधून जातो. सुमारे १४ हजार ८५० कोटी रुपये खर्चून २९६ किलोमीटर लांबीचा हा, चार पदरी द्रुतगती मार्ग बांधण्यात आला असून भविष्यात तो सहा पदरी करता येऊ शकतो. चित्रकूट जिल्ह्यातील भरतकूप जवळील गोंडा गावातील NH-३५ पासून सुरु होणारा हा द्रुतगती मार्ग इटावा जिल्ह्यातील कुद्रेल गावाजवळ आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गाला जोडण्यात आला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.