नीरज चोप्राची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं उद्या २८ जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

नीरजनं नुकत्याच झालेल्या १८ व्या जागतिक ऍथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत रौप्य पदक पटकावलं. मात्र या स्पर्धेदरम्यान मांडीला दुखापत झाल्यानं, त्याला महिनाभर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी काल ही माहिती दिली.