पुण्यात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ

 


मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धुवोली ते शिरगाव दरम्यान काल दरड कोसळल्यामुळे वाडा ते भोरगिरी भीमाशंकर हा रस्ता बंद झाला आहे. दरड हटवण्याचं काम काल रात्री पर्यंत सुरू होतं. पोखरी घाटामध्येही दरड कोसळली होती; ती हटवण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यातील जवळे इथं घराची भिंत अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पुणे शहरात पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डयांमुळं प्रमुख रस्त्यांवर सातत्यानं वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र आहे. 

Popular posts
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
Image
गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
Image
एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात “नाथजल” या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे मोठ्या उत्साहात साजरी
Image