खासदार शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : खासदार शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्लीत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महासंघाच्या सूचनेनुसार राज्य कुस्तीगीर परिषदेने १५ तसंच २३ वर्ष वयोगटांतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन केलं नाही, त्यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. महासंघाने त्यावर संलग्नता रद्द करण्याचा इशाराही देऊनही, राज्य कुस्तीगीर परिषदेनं दुर्लक्ष केल्यानं ही कारवाई केल्याची माहिती, भारतीय कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी दिली.