विधानसभेत शिवसेना गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीला अध्यक्षांची मंजुरी

 


मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभा अध्यक्षांनी काल एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदावर नियुक्ती केली. तर भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. अजय चौधरी यांची गटनेते पदावर नियुक्ती करायला एकनाथ शिंदे गटानं आक्षेप घेतला होता. त्यावर कायद्यातल्या तरतुदींचा उहापोह करुन अध्यक्षांनी हा निर्णय घेतल्यांचं विधीमंडळ सचिवालयानं कळवलं आहे.