काँग्रेस नेते अधिररंजन चौधरी यांचा माफीनामा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतींच्या पदाचा उल्लेख करताना आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी मागितली आहे. तसं पत्र त्यांनी काल राष्ट्रपतींना पाठवलं आहे.

राष्ट्रपतींच्या पदाचा उल्लेख करताना आपण चुकून अयोग्य शब्द वापरला याबद्दल खेद वाटत असल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. या पदाचा उल्लेख करताना अनवधानानं आपल्या तोंडून चुकून अयोग्य शब्द गेला  असा खुलासाही अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. 

चौधरी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपानं संसदेत गदारोळ केला होता आणि काही दिवस कामकाजावर त्याचा परिणाम झाला होता. राष्ट्रपतींविषयी अनुचित शब्दाचा वापर आपल्या पक्षाच्या नेत्यानं केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील भाजपानं केली आहे.