बँकांमधील नोटा मोजण्याच्या यंत्राची तपासणी दर तिमाहीला करावी - रिझर्व बँक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांमधे नोटा मोजण्यासाठी वापरली जाणारी यंत्रं व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची तपासणी दर तिमाहीला करावी असं रिझर्व बँकेनं सांगितलं आहे.

चलनी नोटांवरचा वैधतेचा तपशील नीट वाचता येईल असा स्वच्छ असला पाहिजे. दुर्दशा झालेल्या नोटा तसंच चलनातून बाद ठरवलेल्या मालिकेतल्या नोटा पुनर्प्रक्रीयेसाठी पाठवाव्या असंही रिझर्व बँकेनं सांगितलं आहे. अशा नोटा तसंच बनावट नोटा वेगळ्या काढण्याची क्षमता या यंत्रांमधे असावी. या यंत्रांची देखभाल दुरुस्ती नियमितपणे करण्याचे आणि तसं प्रमाणपत्र वेळोवेळी जारी करण्याचे निर्देश रिझर्व बँकेनं काल जारी केले आहेत. 

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image