राष्ट्रकुल स्पर्धांमधे भारोत्तोलनात संकेत सरगर याला रौप्य तर गुरूराजा पुजारी याला कांस्यपदक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेतलं भारताचं  पहिलं पदक आज  महाराष्ट्राच्या संकेत सरगरनं मिळवून दिलं आहे. पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात एकूण २४८ किलो वजन उचलून रौप्यपदक प्राप्त केलं. सुवर्णपदकाची अपेक्षा होती, मात्र ते थोडक्यात हुकल्यामुळे नाराज असल्याची प्रतिक्रिया सरगर यानं दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संकेत सरगरचं अभिनंदन केलं आहे.