शिवसेनेच्या बारा खासदारांचा एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेतल्या शिवसेनेच्या एकोणीस खासदारांपैकी बारा खासदारांनी एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश केला आहे. या खासदारांनी  संसदीय गटनेते म्हणून राहूल शेवाळे यांची निवड केली आहे अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंबधीचे पत्र आज देण्यात येईल, असेही त्यांनी सांगीतलं. या खासदारांनी शिंदे गटाच्या बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भाग घेतला. 

दरम्यान शिवसेना संसदीय गटनेते विनायक राऊत यांनी संसदीय गटनेतेपदाच्या संदर्भात इतर कोणाचाही दावा मान्य करु नये अशी विनंती काल लोकसभा अध्यक्षांना केली होती.  राजन विचारे यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड झालेली आहे आणि त्याच पदावर आता इतर कोणाची नेमणूक अमान्य करायला हवी असेही त्यांनी म्हटले आहे . 

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image