पंढरपूर वारीतील अपघातग्रस्त वारकऱ्यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आर्थिक मदत

 

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारकरी पंढरपूर येथे जात असताना मंगळवार दि. ५ जुलै रोजी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वारकऱ्यांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीवरुन विचारपूस करुन आर्थिक मदत केली. तसेच अपघातग्रस्त वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार आणि आवश्यकता भासल्यास तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून समुपदेशन करण्याची सूचना रुग्णालय प्रशासनाला दिली.

अपघातग्रस्त वारकऱ्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ.गोऱ्हे यांनी जाहीर केलेल्या मदतीचे वाटप सांगली येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते रुग्णालयात जाऊन करण्यात आले. यावेळी या वारकऱ्यांनी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवरे गावातील वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे आणि परतीच्या प्रवासातही वारकरी यांनी सुरक्षितता बाळगून प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तसेच वारी सुरु असताना त्या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन करावे. पंढरी व इतर वारी मार्गस्थ होण्यासाठी पुढाकार घ्यावा. पोलीस प्रशासनाने सुरक्षित वाहतूक होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देशही उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिले. यावेळी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. अपघातग्रस्त वारकऱ्यांनी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांचे आभारही मानले.

Popular posts
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
Image
गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
Image
एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात “नाथजल” या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे मोठ्या उत्साहात साजरी
Image