मेट्रो कारशेड आरेमध्येच करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा - काँग्रेस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रोची कारशेड आरेमध्येच करण्याचा भाजप प्रणित राज्य सरकारचा निर्णय मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. आरे ऐवजी कांजुर इथं कारशेड उभारण्याचा निर्णय मुंबईकरांच्या आणि पर्यावरण प्रेमींच्या आंदोलनानंतर घेण्यात आला होता.

विकास झाला पाहिजे पण पर्यावरणाचा ऱ्हास करून जनतेच्या मुळावर येणारा नसावा अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आरे मध्येच कारशेड करण्याचा आग्रह होत असेल तर तो कोणाचे हितसंबंध जोपासण्यासाठी होत आहे हे जनतेला समजले पाहिजे, असंही पटोले यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.