चीनमधल्या वुहान प्रांतात हुआनान सीफूड मार्केटनं कोविडच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका - WHO सल्लागार गट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या वुहान प्रांतात हुआनान सीफूड मार्केटनं कोविडच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार गटानं सूचित केलं आहे.  मात्र याबाबत, अधिक तपासाची शिफारस या गटानं  केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या, सायंटिफिक अॅडव्हायझरी ग्रुप फॉर द ओरिजिन ऑफ नॉव्हेल पॅथोजेन्स या सल्लागार गटानं आपल्या पहिल्या अहवालात पुढच्या अभ्यासासाठी चीन आणि जगभरातल्या मानव, प्राणी आणि पर्यावरणावर झालेल्या परिणामासंबंधी अधिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीनं  महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत.