आशियाई कुश्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत पटकावलं अजिंक्यपद

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किर्गिस्तानच्या बिश्केक इथं झालेल्या १७ वर्षाखालील आशियाई कुश्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत अजिंक्यपद पटकावलं. २३५ गुणांसह भारत अव्वल स्थानावर राहिला. या स्पर्धेत भारतानं ८ सुवर्ण एक रौप्य आणि एक कास्य पदक मिळवलं. जपान १४३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला, तर मंगोलिया १३८ गुणांसह तीसऱ्या स्थानावर राहिला. भारताच्या रितिकानं ४३ किलो वजनी गटात, अहिल्यानं ४९ किलो वजनी गटात, शिक्षानं ५७ किलो वजनी गटात, प्रियानं ७३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं.