एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये दाखल

 


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात, बंडाचा झेंडा उभारुन आधी सुरतमध्ये मुक्काम केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे आता आसामची राजधानी गुवाहाटी इथं पोहोचले आहेत. आपल्यासोबत ४० समर्थक आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तत्पूर्वी काल ते आपल्या समर्थकांसह गुजरातमध्ये सुरत इथं मुक्कामी होते. या घडामोडीनंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत पक्षाचे ५५ पैकी १४ आमदार उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज मंत्रीमंडळाची बैठक बोलावली आहे. पक्षांतर-विरोधी कायद्याला बगल देण्यासाठी शिंदे यांना ५५ पैकी दोन-तृतियांश म्हणजे ३७ सेना आमदारांचा पाठिंबा आवश्यक राहील. दरम्यान मुंबईतील उर्वरित शिवसेना आमदारांना लोअर परळ इथल्या एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.