मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज तब्बल ९३४ अंकांची उसळी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज तब्बल ९३४ अंकांची उसळी मारली आणि तो ५२ हजार ५३२ अंकांवर बंद झाला. तीन आठवड्यातली एका दिवसातली ही सर्वात मोठी वाढ ठरली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही २८९ अंकांनी वधारून १५ हजार ६३९ अंकांवर बंद झाला.

जागतिक बाजारातल्या सकारात्मक वातावरणाचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या बाजारात उमटले. माहिती तंत्रज्ञान, धातू, वायू आणि तेल, ऊर्जा, स्थावर मालमत्ता आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बॅंकांना याचा प्रामुख्यानं फायदा झाला.