जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांच्या बदलीसाठीच्या ऑनलाइन यंत्रणेला सुरुवात

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ग्राम विकास विभागातर्फे होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून सुरु करण्यात आल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. 2022 मधील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार असून  या प्रणालीचं  अनावरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज मुंबईत झालं.  त्यावेळी ते बोलत होते.  

ऑनलाईन पद्धतीमुळे शिक्षक बदली प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि यामध्ये गती येईल असं ते म्हणाले.  राज्यात सध्या अंदाजे  2 लाख प्राथमिक शिक्षक असून या प्रणालीमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होणार नाही, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image