निवृत्त न्यायाधीश, न्यायमूर्ती रंजना देसाई यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश, न्यायमूर्ती रंजना देसाई यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती देसाई या प्रेस कौन्सिलच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत.

न्यायमूर्ती रंजना देसाई यांनी अलीकडेच जम्मू- काश्मीर परिसीमन आयोगाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेसाठी हा आयोग स्थापन करण्यात आला होता.