पंढरपूर परिसरात दारुबंदी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर परिसरात दारुबंदी अधिनियमातील कलम १४२ अन्वये ९ ते ११ जुलैपर्यंत शहरासह आजूबाजूच्या पाच किलोमीटर परिसरातील सर्व देशी, विदेशी मद्य, बिअर आणि ताडी विक्री दुकानं बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. संत श्रीतुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सार्वजनिक शांतता राखणं आवश्यक असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येणार आहे.