इस्रोच्या जी सॅट २४ उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं जीसॅट-24 या दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गयानातील कौरू इथल्या अंतरिक्ष केंद्रावरुन आज सकाळी यशस्वी प्रक्षेपण केलं. जीसॅट-24 हा 24-केयु बँड दळणवळण उपग्रह असून त्याचं वजन चार हजार किलोहून अधिक आहे. हा उपग्रह इस्रोनं न्यू स्पेस इंडियासाठी तयार केला. एरियनस्पेस या फ्रेंच कंपनीनं हा उपग्रह अंतराळात पाठवण्याची व्यवस्था केली होती. देशातील डीटीएच सेवेच्या वापरासाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे. अंतराळ क्षेत्रातल्या सुधारणांनंतर न्यू स्पेस इंडियानं हाती घेतलेला मागणीनुसार पुरवठा केलेला पहिलाच उपग्रह आहे. न्यू स्पेस इंडिया ही अंतरिक्ष विभागाच्या अंतर्गत भारत सरकारची कंपनी असून हा उपग्रह त्यांनी टाटा प्ले कंपनीला भाडेतत्वावर दिला आहे.