अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन जणांना नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अटक

 


मुंबई (वृत्तसंस्था) : नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागानं आज दोंडाईचा - नंदुरबार रस्त्यावर न्याहली गावाजवळ अवैध दारुची वाहतुक करणारा कंटेनर पकडला आहे. या कंटेनर मध्ये रॉयल ब्ल्यु कंपनीचे १८० मिलीलिटरच्या १ लाख ३ हजार ६८० बाटल्या आढळुन आल्या आहेत. या सर्व मुद्देमालाची किंमत १ कोटी १४ लाख ६८ हजार इतकी आहे. या वाहतुक प्रकरणी मोहाळ सोलापुर येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.