शेतकरी आंदोलनांत शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची अजित पवार यांची ग्वाही

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतल्या शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुणतांबा इथल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानाचे वाटप १ जुलै या कृषीदिनापासून करण्यात येणार आहे. कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूकही लवकरच करण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलं.