राज्यात आज एकही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद नाही

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ सुरूच आहे. राज्यात आज कोरोनाच्या १ हजार ८८१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ८७८ रुग्ण कोरोनामुक्त झाली. दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यात आज एकाही कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ८ हजार ४३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रात आज १ हजार २४२ रुग्णांची नोंद झाली. तर मुंबई महानगर क्षेत्रात १ हजार ६९० रुग्णांना कोरोनाचं निदान झालं. पुण्यातल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताज्या जनुकीय क्रम निर्धारण अहवालानुसार पुणे शहरातल्या एका महिलेमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन प्रकारातला BA 5 हा उपप्रकार आढळून आला. या महिलेला कोणतीही लक्षणं नव्हती आणि घरगुती विलगीकरणातच ती कोरोनामुक्त झाली.