मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी आपले एकही मत वाया घालवू नका - रामदास आठवले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी आपले एकही मत वाया घालवू नका, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते पवई इथं ईशान्य मुंबई जिल्हा रिपाइंच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

महाविकास आघाडी सरकार हे दलितविरोधी आहे, अशी टीका त्यांनी केली. अनुसूचित जाती जमातीचं पदोन्नतीत आरक्षण, नोकरीतला मागासवर्गीयांचा अनुशेष भरुन काढला जात नाही. मागासवर्गीयांबाबत महाविकास आघाडी सरकार निर्णय घेत नाही असं आठवले म्हणाले. रिपब्लिकन पक्षाच्या ज्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पदावर १० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, त्यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा देऊन नव्यांना संधी द्यावी, आणि पक्षात वरीष्ठ पदावर काम करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.