इयत्ता १०वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार

 


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर  करण्यात येईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एका ट्विटमधून दिली आहे. Mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, ssc.mahresults.org.in या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील. ऑनलाईन निकालानंतर गुण पडताळणी उत्तर पत्रिकांच्या छायांकितप्रती पुनर्मुल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी स्वीकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती अटीशर्थी verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.