रणजी करंडकचा अंतिम सामना आज बेंगळुरू मध्ये होणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रणजी करंडकचा अंतिम सामना आज मध्यप्रदेश आणि मुंबई यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. मध्य प्रदेश पहिल्यांदाच रणजीच्या अंतिम सामन्यात पोचला आहे. मुंबई ४२ व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ फॉर्मात आहे. यशस्वी जैस्वालच्या उपांत्य फेरीच्या दोन्ही डावात शतकी खेळीमुळे मुंबईने उत्तर प्रदेशवर मात करून अंतिम फेरीत धडक मारली. मध्य प्रदेशनं उपांत्य फेरीत बंगालचा पराभव केला.